Skip to Content

आर्थिक यशासाठी ज्योतिष का महत्त्वाचे ?

ह्या अतिशय अवघड व मोठ्या अशा विषयावर भरपूर माहिती गोळा केलेली आहे व आपणासमोर मांडण्याचा मोठा धाडसी प्रयत्न केलेला आहे. ह्या मागे मोठी प्रतिष्ठा मिळावी भरपूर पैसा मिळावा असा काहीही उद्देश नाही, मात्र एक उद्देश नक्की आहे की, आपल्या देशातील कंपन्या आपल्या देशातील शेअर होल्डरचे ९०% भांडवल परंतु बाजार वर खाली करणारे १० ते २० % परकीय, जर त्यांची आर्थिक परिस्थिती नाजुक झाली तर माझा सर्व देश अडचणीत, शेअर मार्केट अडचणीत असे का?
आजच्या काळाची गरज समजून प्रत्येकाने शेअर बाजारात थोडे लक्ष घातले व थोडी रक्कम इनव्हेस्टमेंट केली तर शेअर बाजार कोणाच्या मालकीचा राहणार नाही.

त्याकरिता सर्वसामान्य माणसास समजेल व तो अभ्यास करू शकेल व आपल्या सेव्हींग मधील अगदी थोडी रक्कम बाजारात गुंतवू शकेल व ती गुंतविताना त्याला सर्व बाजुंनी मार्गदर्शन होईल ह्या उद्देशाने हे संकेत स्थळ बनवले आहे.

शेअर मार्केट ही तर सेकंदा सेकंदाची गम्मत आहे व सेकंदाचाच अभ्यास करावयाची आपण सर्वांनी सवय केली तर शास्त्र कोठे जाईल.

सर्व आमच्या संकेत स्तळावरती येणाऱ्या लोकांना  एकच विनंती आहे, ह्यातील जास्तीत जास्त चुका काढण्याचा प्रयत्न करा. त्या कळवा त्यावर आपण सखोल अभ्यास करू. ह्या शास्त्रात माझ्यापेक्षाही खूप मोठमोठे लोक आहेत.त्यांना हे शास्त्र मोठे होण्याची खूपच कळकळ आहे हे निर्दशनास येते.

ह्याच विषयावर आम्ही अतिखर्चाचे सॉफ्टवेअरही करीत आहोत.येथे पैसे आणि व्यवहार ह्याचा संबंध नाही. ज्या महान लोकांनी शास्त्रे तयार करून ठेवलेली आहेत. त्यास त्यांनी कोणत्याही रॉयल्टीची कधीच अपेक्षा केलेली नाही. मी हिंदू आहे, मी मुसलमान आहे, मी ख्रिश्चन आहे व त्या धर्मात राहण्यासाठी कोणाला रॉयल्टी द्यावी लागत नाही. असो, प्रभूची इच्छा आहे. त्याने सर्व रकमेची व्यवस्था केली आहे.

ह्या संकेतस्थळांवरती प्रामुख्याने स्वतःच्या विचारांपेक्षाही शेअर बाजाराची परिस्थिती व त्या कालावधीत ग्रहांची परिस्थिती यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेअर बाजारामध्ये वर किंवा खाली ह्या दोनच परिस्थिती असतात. त्याचा विचार करून १९९५ ते २००७ या कालावधीत, प्रतिदिवशी शेअर बाजार उघडल्यानंतर त्या दिवसाच्या चंद्राची काय परिस्थिती आहे. त्या दिवशी चंद्र कोणत्या नक्षत्रात होता. कोणत्या चरणात होता व त्या चारही चरणामध्ये शेअर बाजाराची प्लस किंवा मायनस या पैकी काय झाले ते ह्या संकेतस्थळावरती अभ्यास केला आहे.

शेअर बाजारची हिस्ट्री ही बी. एस. ई. मार्केटच्या साईटवरून घेतली आहे. त्या दिवसाचा चंद्र व त्याचे सब असा चार्ट केला आहे. त्याचप्रमाणे बी.एस.ई. मार्केट सेन्सेक्सच्या ३० कंपन्यांचा न्यूमरॉलॉजी पद्धतीनुसार कसा अभ्यास होऊ शकेल याची माहिती घेऊन अभ्यास केला आहे.

त्याचप्रमाणे शनि मंगळाच्या युतीच्या कालावधीत शेअर मार्केटची काय परिस्थिती होती याचा मागील २० वर्षांचा आढावा घेतलेला आहे. हे सर्व श्री.किरण पाटील यांचे विचार आहेत. त्यावर प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकाराने विचार करू शकेल. शेअर बाजार सतत बदलणारा आहे. त्याचप्रमाणे कृष्णमूर्ती पद्धतीतील उप उप नक्षत्र स्वामी हे पण सतत बदलणारे आहेत. त्या दोन्ही गोष्टींची सांगड घालण्याचा मिक्रो व मायक्रो ह्या प्रकरणात प्रयत्न केलेला आहे.

त्यापुढे ग्रह, त्यांचे गुण व त्यांचे कारकत्वाप्रमाणे ते शेअर मार्केट मधील कोणत्या कंपन्यांवर कशा पद्धतीने परिणाम करू शकतात. याचा विचार केलेला आहे.
उदा. रवि हा ग्रह जीवनदाता आहे. तसेच तो सृष्टीच्या एनर्जीचा मालक आहे. त्याप्रमाणे शेअरमार्केटमध्ये असलेले फार्मा सेक्टर जीवनदायी असल्याने तसेच रवि हा उर्जाचा मालक असल्याने त्याचा पॉवर सेक्टरशी सांगड घालण्याचा प्रयत्न केलेला आहे.

ह्या प्रमाणे शेअर बाजार व भविष्यशास्त्र यांची सांगड घालण्याचा या प्रकरणात प्रयत्न केलेला आहे. तो अभ्यासकांकरीता उपयोगी ठरावा किंवा त्यांना एक नवीन दिशा मिळावी ह्या उद्देशाने हे संकेतस्थळ तयार केले आहे.


सदर संकेतस्थळाचा वापर करताना स्वतः विचार करून स्वतः प्रयोग करून, निर्णय घेऊन, स्वतःच्या पत्रिकेप्रमाणे सूज्ञाचा सल्ला घेऊन शेअर बाजारात व्यवहार करावा, व भरपूर नफा कमवावा.

धन्यवाद !